‘गडकरींनी करून दाखवलं !’ विदर्भातील उत्पादित रेमडेसिवीरचा पहिला साठा हस्तांतरित

Nitin Gadkari - Maharashtra Today

नागपूर : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा आणि काळाबाजार होत असल्याचं राज्यात सर्वत्र पाहायला मिळालं. अशा वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनाची परवानगी मिळवून राज्याला मोठा दिलासा दिला आहे. आज या कंपनीतून इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर आला आहे. विशेष म्हणजे हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल ३० ते ४० हजारांना विकल्याच्या अनेक घटना घडल्याच्या उघडकीस आल्या आहेत.

आज वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीतून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर पडला. एकूण १७ हजार इंजेक्शन्स तयार झाले आहेत. वर्धा इथं उप्तादित झालेले हे इंजेक्शन नागपूरसह राज्यभरात वितरित केले जाणार आहेत. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल सभेत हे इंजेक्शन सुपूर्द करण्यात आले. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत ५ मे रोजी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button