गडकरींनी करून दाखवले ; वन्यजीवांची सुरक्षीतता लक्षात घेऊन महामार्गांवर 14 अंडरपास तयार, देशातील हा पहिला प्रकल्प

nitin Gadkari

नागपूर : केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या दूरदृष्टी ठेऊन करण्यात येणा-या कार्याचे कौतुक नेहमीच होत असते. आताही केंद्रिय मंत्री गडकरी यांच्या कामाला कार्याला सलाम म्हणावा असा एक प्रकल्प देशात पुर्णत्वास आला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी NH-44 (old NH-7) वरील 28 कि.मी. कुरई घाटातील निर्माणाधीन फोर लेन रोडची पाहणी केली. वन्यजीवांची सुरक्षितता लक्षात घेऊन या महामार्गावर 14 अंडरपास तयार करण्यात आले आहेत.

तसेच दोन्ही बाजूला कटघरेही लावण्यात आले आहेत. अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना ब्लॅक स्पॉट व अपघात बिंदू चिन्हांकित करून तेथे काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी इतक्या मोठ्या संख्येने अंडरपास तयार करण्याचा हा देशातील पहिला प्रकल्प आहे.

या प्रकल्पाचे उर्वरित काम मार्चअखेरीस पूर्ण केले जाईल. मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर खवसा ते मोहगाव असा हा चौपदरी मार्ग पूर्ण झाल्याने नागपूर ते रीवा असा 15 तासाचा प्रवास 8 ते 9 तासात पूर्ण होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER