गडकरींना फडणवीसांच्या जीवाची काळजी; म्हणाले, तुमचं कार्य गरजेचे, पण हात जोडून विनंती

Devendra Fadnavis - Nitin Gadkari - Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या वाढत आहे. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अन्य भाजप नेते, कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करत प्रेमळ सल्लाही दिला आहे. कोरोना काळात आधी स्वत:ची तब्येत सांभाळा, कुटुंबियांना जपा आणि शक्य होईल तसं सगळी कामं ऑनलाईन करा, असं आवाहन गडकरी यांनी केलं. भाजपाच्या नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपाप्रसंगी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यावरुन गडकरी यांनी फडणवीसांना प्रेमळ सल्ला दिला. ‘देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी गडचिरोलीचा दौरा केला. ते जे काम करत आहेत ते आवश्यक आहे. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं बसली होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय उपलब्ध आहे. विनाकारण कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर बोला. तुम्ही जेवढं हलक्याने घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावून बसलेलो आहेत’, अशा शब्दात गडकरी यांनी फडणवीसांना दौरे टाळण्याची विनंती केली.

आता अन्य रस्ते, पुल, पक्षाची कामं महत्वाची आहेतच. पण ती कामंही घरुन बसूनच घरा. आता येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांना गमावणं हे आपल्याला परवडणारं नाही. ही पक्षाची वगैरे जी काम आहेत ती महत्वाची आहेत. पण आधी आपला जीव वाचला तर पुढे काही करता येणार आहे. त्यामुळे आता पहिली प्राथमिकता आपला जीव वाचवणे आहे. आपलं कुटुंब आहे. दुसरी आपल्या घराच्या सगळ्या आर्थिक व्यवस्था आणि मग तीसरी प्रायॉरिटी आपला पक्ष, समाज. भावनेच्या भरात आपण अनेक बाबींना दुर्लक्षित करतो. पण तसं करणे आता घटक आहे, असं आवाहनही गडकरी यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button