गडकरींचा थेट सन फार्मच्या मालकाला फोन; नागपुरात तत्काळ रेमडिसीवीरचे १० हजार इंजेक्शन

Nitin Gadkari - Remdesivir

नागपूर :- कोरोना (Corona) महामारीमुळे महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे अनेक ठिकाणी डॉक्टर्स, नर्सेस, तसेच औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. नागपुरात तर ही परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. नागपुरात रेमडिसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा साठा संपलेला असून लोकांना वणवण भटकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा साठा पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा केली.

तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीसुद्धा सन फार्माच्या मालकाकडे केली. या चर्चेनंतर नागपुरात लवकरच एकूण १० हजार रेमडिसिवीरची इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहेत. आजच्या आज तत्काळ पाच हजार इंजेक्शन्स फार्माकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर उर्वरित पाच  हजार इंजेक्शन्स आगामी दोन दिवसांत उपलब्ध करून दिले जातील.

ही बातमी पण वाचा : रेमडेसिवीर न मिळाल्याने लोक रस्त्यावर; माणूस जगणं महत्त्वाचा; भुजबळांचा केंद्रावर हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button