गडचिरोलीतील नक्षलवाद व विकासाच्या मुद्द्यावरून गडकरींचा वनविभागावर ठपका

Nitin Gadkari

नागपूर : केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी पूर्व विदर्भातील गडचिरोली (Gadchiroli) या आदिवासी जिल्ह्यातील मागासवर्गीय आणि त्याचबरोबर माओवाद्यांच्या समस्येसाठी वनविभागाला (forest dept) जबाबदार धरले.

रविवारी गडकरी यांनी तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांसह शेजारच्या राज्यांना जोडणा-या पुलाचे ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गडचिरोलिच्या विकासावरह व नक्षलवाद समस्येवर भाष्य केले.

गडकरी यांनी आंध्रप्रदेश, तेलगंना आणि शेजारच्या राज्यांना महाराष्ट्राशी जोडणा-या 777 कोटी रुपयाच्या पुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी वनविभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले तसेच, गडचिरोलीच्या विकासासाठी येथील वनविभाग जबाबदार असल्याचे म्हटले.

यंदाच्या पावसाने गडचिरोलीतील वैनगंगा नदी पुलावरून वाहत आहे. वैनगंगेच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत जाले आहे. शेजारी जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमिवर गडकरी म्हणाले, यापूढे वैनगंगेच्या पुरामुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही अशी खाळजी घेऊन जिल्ह्यातील पेरीमिली, बंडिया, परलाकोटा आणि वैनगंगा नदीवर चार पूल बांधले जातील, जेणेकरून पावसाळ्याच्या पूरात तालुक्यांचा संपर्क तुटणार नाही. या चार पुलांच्या बांधकामातून अंदाडे अंदाजे 50 कोटी रुपये वाचतील त्या खर्चात आणखी काही छोटे प्रकल्प हाती घेण्यास मदत होईल असे गडकरी यांनी उद्घाटनादरम्यान मंजूर केले.

तसेच, येत्या दोन वर्षात गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलण्याचे वचन देणारे गडकरी म्हणाले की, ते गडचिरोली जिल्ह्याशी भावनिकदृष्ट्या जुळलेले आहेत आणि त्यांनी 1995 मध्ये पीडब्ल्यूडी मंत्री असतानापासून त्यांनी गडचिरोलीच्या विकासाला हातभार लावला आहे. जिल्ह्यातील संपर्क आणि शेजारच्या राज्यांशी संवाद सुधारण्याचे माझे स्वप्न आहे, असेही गडकरी म्हणाले.

दरम्यान, गडकरी यांच्याकडे शिपिंग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे पोर्टफोलिओ असून जिल्ह्यातील विकास आणि कायदा व सुव्यवस्थेच्या समस्येसाठी वन विभाग जबाबदार आहे. खासदार अशोक नेते यांच्या वडसा देसाईगंजला जोडण्यासाठी उभारलेला रेल्वे प्रकल्प “वनविभागाने निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे अडकला” असही गडकरी यांनी नमूद केले.

गडचिरोलीला शेजारच्या जिल्ह्याशी व नागपुरला जोडता यावे यासाठी मेट्रोची योजनाआखण्याचेही गजडकरी यांची योजना आहे त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करावी असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

चंद्रपूर आणि अकोला जोडण्यासाठी त्यांनी ब्रॉडगेज मेट्रो उभारण्याची आशा व्यक्त केली. “जिल्हाभरातील क्लस्टर्समध्ये विकसित होणा-या विविध प्रकल्पांद्वारे सुमारे १००० लोकांना रोजगाराची संधी मिळू शकते,” असे गडकरी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER