महाराष्ट्रातील रस्तेबांधणीसाठी गडकरींची मोठी घोषणा; २,७८० कोटी मंजूर

Nitin Gadkari

नवी दिल्ली :- देशाच्या विकासासाठी पायाभूत आणि रस्ते विकास महत्त्वाचा असतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील रस्तेबांधणीसाठी तब्बल २,७८० कोटी रुपयांच्या तरतुदीची त्यांनी घोषणा केली.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एकामागून एक ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रातील या कामांसाठी २,७८० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. हे ट्विट करताना नितीन गडकरी यांनी ‘प्रगती का हायवे’ असा हॅशटॅग वापरला आहे. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुनर्बांधणी  आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली.

महाराष्ट्रातील रस्तेकामांपैकी कोकणवासीयांसाठी गडकरींनी खास भेट दिली आहे. चिपळूणच नाही तर जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग-७५३ जे  विस्तारीकरणासाठी २५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे नितीन गडकरींनी ट्विटरवरून सांगितले. सदर रस्ता दोन किंवा चार पदरी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग-७५२ आयवरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी २२८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच तिरोडा  ते गोंदिया दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग-७५३ च्या दोन पदरी रस्ते बांधकामासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तारीरी- गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग-१६६ जीवरील रस्त्याच्या कामासाठी १६७ कोटी रुपये, तिरोडा- गोंदिया राज्य महामार्गाच्या बांधकामासाठी २८८.१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, राष्ट्रीय महामार्ग-७५३ अंतर्गत २८.२ किमीचा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे. गडचिरोली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग-३५३ सीवरील २६२ किमी ते ३२१ किमीच्या अंतरामध्ये १६ लहान-मोठे पूल बांधण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. यासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी १८८ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, हा पूल राष्ट्रीय महामार्ग-६३ चा भाग असेल. नागपूरमध्ये (Nagpur) आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाण पूल, राष्ट्रीय महामार्ग-५३ वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाण पूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एकूण ४७८ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमगाव-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग-५४३ साठी २३९ कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्ग-३६१ एफच्या परळी गंगाखेड दरम्यानच्या कामासाठी २२२ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button