दोन नक्सलवाद्यांना कंठस्नान, गडचिरोली पोलिसांची कारवाई

Naxal Attack
Representative Image

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात असलेल्या जंभिया-गट्टा पोलीस मदत केंद्राच्या परिसरातील जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन नक्सलवाद्यांना (Naxalite) कंठस्नान घालण्यात आले. सध्या त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तर पोलिसांकडून जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

जांभिया-गट्टा पोलीस मदत केंद्रावर तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. हॅन्डग्रेनेडही फेकला होता. पण तो निकामी होता. पोलिसांना बाहेर येण्यासाठी प्रवृत्त करून घातपात घडविण्याचा डाव असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी सावध पवित्रा घेत नक्षलवाद्यांचा तो डाव उधळून लावला होता.

दरम्यान नक्षलविरोधी अभियान राबविणारे सी-६० पोलीस पथक जंगल परिसरात शोधमोहीम राबवत असताना बुधवारी सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात दोन पुरुष नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यांनी २६ एप्रिल रोजी बंदचे आवाहन केले होते. या दिवशी अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे रस्त्याच्या कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर झालेल्या आज झालेल्या कारवाईनंतर नक्सलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button