पावणेदोन लाख रुपये लाच : दोन वनाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

bribe case

गडचिरोली : संरक्षण व अतिक्रमण प्रकरणाची चौकशी शिथिल करण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेण्याच्या आरोपात वनपरिक्षेत्र अधिकारी दिवाकर रामभाऊ कोरेवार (४८) आणि प्रेरणा उईके (३४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन विभागाच्या फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिवाकर रामभाऊ कोरेवार याने या प्रकरणात दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोड होऊन १ लाख ७५ हजार रुपये घेण्याचे ठरले. पैसे कोरची तालुक्यातील बेडगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेरणा उईके यांनी घेण्याचे ठरले.

याबाबत तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सापळा रचण्यात आला. पैसे स्वीकारल्यानंतर प्रेरणा व दिवाकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मागदर्शनात निरीक्षक रवि राजुलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER