कुठे केंद्र बंद, तर कुठे रांगा; महाराष्ट्रात लसीकरण मोहिमेचा फज्जा

Fuss of vaccination campaign in Maharashtra

मुंबई :- कोरोनाचा नायनाट आजपासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाला सुरूवात झाली आहे. परंतु, लशीचा पुरेसा साठाच उपलब्ध नसल्याने अनेक केंद्र बंद आहे. तर ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनाच लस दिली जात आहे. मुंबईत जोपर्यंत एसमएमस मिळत नाही, तोपर्यंत लसीकरण केंद्रावर येऊ नका, असं आवाहनच महापौरांना करावं लागले आहे. राज्यात ठिकठिकाणी हीच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे.

पुण्यात लसीकरण केंद्रावर आजही गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळालं आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी पुण्याला २० हजार लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात केवळ १९ केंद्र सुरू असून २ केंद्र पुण्यात आहेत. त्यामध्ये कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे आजच्या दिवशी लसीकरण केलं जाणार आहे. शहरात एकूण ७०० नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र, अनेकांनी नोंदणी केली असली तरी नियोजन केंद्र आणि वेळ निश्चित होत नसल्यानं लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम असून नागरिकांनी मोठी गर्दी केली.

तर, नागपूरमध्ये यासाठी लागणार अतिरिक्त लसीचा साठा उपलब्ध नसल्याने ही मोहीम पुढे ढकलण्याची माहिती काल नागपूरच्या पालिका आयुक्तांनी दिली होती. मात्र, मुंबईला प्रशासकीय स्थरावर निर्णय झाल्याने आज नागपूर (Nagpur) मध्ये मर्यादित स्तरावर १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यासाठी लाभार्थ्यांचे नाव नोंदवून त्यांना टोकन दिले जात आहे. आज २ वाजता महापौरांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरवात होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील लसीकरणाच्या फज्जा वाढला आहे. नागरिक रांगा लावून उभे आहेत मात्र लस मिळेल का नाही याचा भरोसा नसतो.नगर शहरसह जिल्ह्यात हिच परिस्थिती आहे. स्थानिक स्तरावर कुठलंही नियोजन नाही. मात्र, रात्री उशिरा अहमदनगर जिल्ह्यासाठी दहा हजार लशी प्राप्त झालेले आहेत. त्या दहा हजार लशीचे लसीकरण अहमदनगर शहरांमध्ये पाच केंद्रावर हे लसीकरण करणार आहे. मात्र रात्री लशींचा जो साठा आला आहे तो अजून पर्यंत जिल्हा परिषदेत असून तो पालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे, त्यानंतर लसीकरण सुरू होईल परंतु घोषणा केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्याने लसीकरणाचा फज्जा उडाला आहे.

वर्ध्यात लशीचा साठा पोचलाच नसल्याने लसीकरण होणार नाही. केंद्र सरकारने दिलेले डोस राज्य सरकारला वापरता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने राज्यासाठी ३ लाख डोसची खरेदी केली आहे. त्यापैकी जिल्हासाठी ५ हजार डोज आज संध्याकाळपर्यंत मिळणार आहे. जिल्ह्यात पाच केंद्रावरून लसीकरण केले जाणार आहे. वर्ध्यातील लेप्रसी फाउंडेशन रामनगर, पोलिस रुग्णालय वर्धा, यूपीएस टाका ग्राउंड हिंगणघाट, उपजिल्हा रुग्णालय आर्वी, ग्रामीण रुग्णालय पुलगावचा समावेश आहे.

साताऱ्यात कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात आता पर्यंत ३ वेळा लसीकरण बंद करण्याची वेळ आली होती. जिल्ह्यातील ५ केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर लसीकरण दिले जाणार आहे. नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करूनच केंद्रावर यावं असं आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button