महाराष्ट्रात आणखी लॉकडाऊन वाढणार; सरकारमधील मंत्र्यांचे संकेत

Maharashtra Lockdown

मुंबई :- राज्यात कोरोना (Corona) संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन (Lockdown) पुन्हा वाढवण्यात येणार आहे. कोरोनाची परिस्थिती काहीशी टोक्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सूचित केले आहे की, लॉकडाउन त्वरित वाढणार नाही. संपूर्णपणे कोरोनावर मात करण्याच्या प्रयत्न आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि उदय सामंत (Uday Samant) या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी सरकार लॉकडाउन वाढवण्याच्या तयारीत आहे, असे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लावले होते. मात्र, परिस्थिती जैसै थे होती. नंतर २२ एप्रिलपासून पुढील १५ दिवस लॉकडाउन वाढवले. कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. पण तिसरी लाट येण्याआधी महाराष्ट्रात सरकारला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत.

ज्यात प्रथम लसीकरण, ICU बेड्सची संख्या, ऑक्सिजनचा पुरवठ्याचा समावेश आहे. यासाठी लॉकडाउन गरजेचे आहे, असे मत महाविकास आघाडीतले नेते करत आहेत.

कॅबिनेट बैठकीत लॉकडाउन वाढवायचा की नाही, याची चर्चा केली जाईल. यात शहरनिहाय रुग्णांची आकडेवारी समोर मांडली जाईल, लॉकडाउनचा किती परिणाम सध्या होतोय आणि वाढवला तर किती परिणाम होईल, यावर सगळे अवलंबून आहे.

ही बातमी पण वाचा : रेमडेसिवीरवरून केंद्र १०० टक्के अन्याय करतंय : छगन भुजबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button