कोरोनामुळे वाढल्या साखर कारखानदारी पुढील अडचणी

Coronavirus - Sugar Industries

सातारा : राज्यात सहकारी 105 आणि 100 खासगी असे एकूण 205 साखर कारखाने (Sugar Industries) आहेत. त्यापैकी सुमारे 30 कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. त्यामुळे यंदा किमान 180 साखर कारखाने गळीत हंगाम सुरू करतील असा अंदाज आहे.

कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा (Satara), सोलापूर (Solapur), पुणे (Pune) आणि अहमदनगर (Ahmednagar) या साखर पट्ट्यात कोरोनाचा (Corona) सर्वाधिक प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तोडणी वाहतूकदारांच्या मनात निर्माण धाकधूक आहे. त्यामुळेच ऊसतोडणी मजुरांनी संपाचा इशारा दिला आहे. शासनाने कोविड सेंटर उभारणीची सक्ती साखर कारखान्यांना केली आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या गळीत हंगामात आधीच मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांची कोरोनामुळे ‘कोंडी’ होण्याची चिन्हे आहेत.

कोरोनाने या कारखान्यांपुढे यंदा अनेक समस्यांचे ताट वाढून ठेवले आहे. कारखान्यांनी तोडणी-वाहतूक मजुरांसाठी किमान 100 खाटांचे कोविड सेंटर उभारले नाही तर त्या कारखान्यांना यंदाचा गाळप परवाना न देण्याचा इशारा शासनाने दिला आहे.

त्यामुळे आता कारखानदारांनी कोविड सेंटर उभारणीसाठी धावाधाव सुरू केली आहे. या सेंटरची उभारणी वेळेत केली नाही, तर गाळप परवाना मिळणार नसल्याने आता ऊस उत्पादकांचे देखील या उभारणीकडे लक्ष लागून राहिले आहे. एफआरपीचे देणे, शिल्लक साखर, उसतोडणी मजुरांचा तुटवडा या अडचणीतून वाटचाल करणाऱ्या साखर कारखानदारीला यंदा कोरोना संसर्गाचे नवे आव्हान असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER