कोल्हापुरातील पूल आणि रस्ते बांधणीसाठी निधी द्या : आ. ऋतुराज पाटील

Ruturaj Patil

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील रस्ते , लहान पूल, गटर्स या प्रस्तावित कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी द्यावा अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मंगळवारी केली .

भाजपचे फसव्या कर्जमाफी विरोधात कोल्हापुरात धरणे आंदोलन

विकासवाडी, नेर्ली, तामगांव, ऊजळाईवाडी विमानतळमार्गे मुडशिंगी, वसगडे लांबोरे मळा , आय.टी.आय, पाचगांव, नंदगाव, चंद्रे, निगवे, कावणे, चुये, वडकशिवाले, हलसवडे, पट्टणकोडोली येथील रस्त्यांची दूरुस्ती करण्याची गरज आहे. चंद्रे, निगवे, कावणे चुये, पट्टणकोडोली प्रजिमा 89 कि.मी 7/00 ते 8/00 पुल व रस्ता करणे (कावणे ते चुये),राष्ट्रीय महामार्ग क्रं. 4 नवे चिंचवाड फाटा रुकडी ते रा.मा. 200 ला मिळणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्रं. 200/00 ते 600/0 रस्ता सुधारणा आदीसाठी निधी मिळावा असे या निवेदनात म्हटले आहे.