‘महाराष्ट्राला केंद्राकडून संपूर्ण सहकार्य’, पवारांनी केंद्र सरकारवर व्यक्त केला विश्वास

मुंबई :- सध्या राज्यात कोरोनाचे (Corona) संकट अधिकच गडद होत असताना सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे (Sachin Waze’s letter bomb) राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरही वसुली करायला लावल्याचे गंभीर आरोप केले आहेत. यासर्व घडामोडीत महाविकास आघाडी सरकारची कोंडी होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आता सरकारच्या बचावासाठी पुढे आले आहेत. पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.

सध्या राज्यात सुरु असलेल्या कडक निर्बंधांवरून जनतेमध्ये सरकारच्या विरोधात संताप निर्माण झाला आहे. व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने रोजगार जात आहे. मात्र असे निर्बंध लावण्यास सरकारची कुठलीही इच्छा नाही. मात्र राज्यात उदभवलेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला. राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला लसीचा पुरवठा करण्याची मागणी केली. मात्र केंद्राकडून पत्रक काढून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाही.

कोरोना परिस्थिती अत्यंत भीषण असून हा कसोटीचा काळ आहे, या काळाला धैर्याने सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे पवार यांनी म्हटले. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत, याचा दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचाही हाच सूर आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे. मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी, केंद्र सरकार संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार म्हणाले.कामगार, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कित्येकांना आर्थिक झळ बसत आहे. या परिस्थितीला धैर्याने आपण सामोरे गेलेच पाहिजे, याला पर्याय नाही. समाजातील प्रत्येक घटकाला माझी विनंती आहे, आपण वास्तव स्विकारायला हवे. जनतेच्या जिविताच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहे. त्यासाठी, सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही पवार यांनी म्हटलं.

ही बातमी पण वाचा : आम्हाला कृपया लसींचा पुरवठा करा ; सुप्रिया सुळेंची केंद्राला विनंती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button