
पुणे :- जेजुरी गडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर जेजुरी देवस्थानने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला (Full size statue of Ahilya Devi Holkar ) आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते येत्या १३ फेब्रुवारीला या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे १६ वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत.
जेजुरी देवस्थान ट्रस्टच्यावतीनं तब्बल २० फूट उंचीचा ब्रांझ धातूचा अहल्याबाईंचा पुतळा उभारण्यात आला आहे. यासाठी तब्बल ५५ लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विविध परवानग्या घेऊन शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.
ही बातमी पण वाचा : ‘पवारांची पॉवर’, भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीला दिली ५ कोटींची देणगी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला