‘फुकाचे सल्ले देणाऱ्यांनो, काँग्रेस सोडा !’ अधीर रंजन चौधरी उतरले राहुलच्या समर्थनात

Adhir Ranjan chaudary

नवी दिल्ली :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करत सल्ला दिल्याने पक्षात वादळ निर्माण झाले आहे. बिहारमधल्या पराभवानंतर (Bihar Election 2020) पुन्हा पक्षनेतृत्वाच्या विरोधाचा सूर उमटत आहे. यामुळे काँग्रेसचे ज्येठ नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) नेतृत्वावर प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर उखडले. म्हणाले – फुकाचे सल्ले देणाऱ्यांनो, काँग्रेस सोडून बाहेर निघा.

काँग्रेसच्या बिहारमधील वाईट कामगिरीनंतर एका मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. ‘परिस्थिती आता हाताबाहेर गेली असून आत्मचिंतन करण्याची वेळही निघून गेली आहे’ असे म्हणाले होते. यामुळे राहुल गांधी यांचे समर्थक आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बल यांच्याविरुद्ध हल्ला सुरू केला आहे.

अधीर रंजन चौधरी म्हणाले, बिहारमधल्या पराभवानंतर अशा वाचाळ नेत्यांना जास्तच जोर चढला आहे. हे नेते कधीही निवडणुकीत विजयी होत नाहीत. पक्ष संकटांचा सामना करत असताना अशा वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते. ज्यांना काँग्रेस योग्य वाटत नसेल त्यांनी अशा लज्जास्पद गोष्टी करण्यापेक्षा पक्षातून निघून जावं, वेगळा पक्ष स्थापन करावा किंवा इतर पक्षात सामील व्हावं, मात्र उगाच सल्ले देत आपला वेळ वाया घालवू नये.

सिब्बल

संघटनेची माहिती असलेल्या, अनुभवी, कार्यकर्त्यांना समजून घेणाऱ्या नेत्यांना संघटनेत पुढे आणलं पाहिजे. मात्र नेतृत्वाकडून असे प्रयत्न होत नाहीत. जनाधार असलेल्या नेत्यांचा उपयोग ज्या प्रकारे करायला पाहिजे तसा होत नाही. सिब्बल यांच्यासह पक्षातल्या ३२ नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पत्रानंतरही पक्षनेतृत्वाच्या शैलीत कुठलाही बदल झाला नाही.

त्यांच्याकडून संवादाचा प्रयत्नही झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे व्यक्त होण्यासाठी माध्यमांकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असं सिब्बल म्हणालेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनीही सिब्बल यांच्यावर टीका करताना म्हटले आहे – पक्षांतर्गत मुद्दे जाहीर करण्याची सिब्बल यांना काहीही गरज नव्हती. माध्यमात जाऊन काहीही साध्य होणार नाही. कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसच्या देशभरातल्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. काँग्रेस पक्ष अनेक संकटांमधून गेला आहे. या संकटामधूनही पुन्हा एकदा काँग्रेस झेप घेईल, असंही गेहलोत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER