इंधन दरवाढीला १३ दिवसांनी लागला ब्रेक

Petrol price Rise

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीला तब्बल १३ दिवसांनी ‘ब्रेक’ लावला आहे. शनिवारी दिल्लीत पेट्रोल ३९ पैसे, तर डिझेल ३७ पैशांनी महागले होते. दिल्लीत पेट्रोल ९०.५८ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ८०.९७ रुपये प्रति लिटर आहे. रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या १२ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. देशातील सर्व मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी किंमतीपर्यंत पोहोचले आहेत.

२०२१ मध्ये पेट्रोल ६.४६ रुपयांनी महाग झाले आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अवघ्या २४ दिवसात वाढले. त्याचबरोबर या २४ दिवसांत डिझेल प्रति लिटर ६.७७ रुपयांनी महाग झाले. गेल्या १० महिन्यांत त्याची किंमत जवळपास १७ रुपयांनी वाढली आहे. आज दिल्लीत पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे पेट्रोलचे प्रति लिटर ९०.५८ रुपये तर डिझेल ८०.९७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहेत. मुंबईतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल ९७ रुपये तर डिझेल ८८.०६ रुपये दराने विकले जात आहे.

कोलकातात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर ९१.७८ रुपये, डिझेलचा दर ८४.५६ रुपये आहे. चेन्नईतही इंधन दरवाढ न झाल्याने पेट्रोलचे दर प्रति लीटर ९२.५९ रुपये तर डिझेलचे दर ८५.९८ रुपये प्रतिलिटर आहेत. बेंगळुरूमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढलेल्या नाहीत. शहरात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९३.६१ आणि डिझेलचे दर ८५.८४ रुपये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER