इंधन दरवाढ : केंद्राकडे बोट दाखवण्याआधी राज्याचा कर कमी करा, चंद्रकांत पाटलांचा टोमणा

Chandrakant Patil-Uddhav Thackeray.jpg

मुंबई :- इंधनदरवाढीच्या (Fuel price hike) निषेधात काँग्रेसने आज राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले. इंधनावर राज्य आणि केंद्राने मोठ्या प्रमाणात कर लादल्याने ही दरवाढ होते आहे. यासाठी राज्यात सत्तेवर असलेले मविआमधील भाजपाविरोधी (BJP) पक्ष केंद्राकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी टाळत आहेत. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil )यांनी राज्य सरकारला टोमणा मारला – राज्याने केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा आपला कर कमी करावा म्हणजे इंधनाचे दर कमी होतील.

दरम्यान, राज्यासह देशातल्या अनेक भागात पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या दरात लिटरला २१ पैशांची, तर डिझेलच्या दरांत लिटरमागे २० पैशांनी वाढ करण्यात आल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. ४ मेपासून विसाव्यांदा करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे देशभरातील इंधनाच्या दरांनी ऐतिहासिक विक्रम केला आहे.

मुंबईत आता पेट्रोलसाठी लिटरला १०१.३ रुपये, तर डिझेलसाठी लिटरमागे ९३.३५ रुपये मोजावे लागत आहेत. पुण्यामध्ये शंभरी पार केलेल्या पेट्रोलच्या दरात आज अजून अजून वाढ झाली आहे. पुण्यात सध्या पेट्रोल १०१.१८ रुपये तर पॉवर पेट्रोल १०४.८७ रुपये लीटर झाले आहे. डिझेल प्रतिलीटर ९१.८२ रुपये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button