इंधन दरात लिटरमागे प्रत्येकी 35 पैशाची वाढ

Diesel & Petrol Price High

नवी दिल्ली :- जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर कडाडल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) दरात वाढ सुरूच आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी इंधन दरात लिटरमागे प्रत्येकी 35 पैशाची वाढ केली. या दरवाढीनंतर बहुतांश शहरात पेट्रोल व डिझेलचे दर नव्या उच्चांकी स्तरावर गेले आहेत.

गेल्या तीन दिवसांत तेल कंपन्यानी पेट्रोल, डिझेल दरात कोणतीही वाढ केली नव्हती, मात्र मंगळवारी तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रती लिटरचे दर 87.30 रुपयांवर गेले असून मुंबईमध्ये पेट्रोल 93.83 रुपयांपर्यंत कडाडले आहे. दुसरीकडे दिल्लीत डिझेलचे लिटरचे दर 77.48 रुपयांवर पोहोचले असून मुंबईत हे दर 84.36 रुपयावर पोहोचले आहेत. याआधी 5 फेब्रुवारी रोजी तेल कंपन्यानी इंधन दरात 30 पैशांची वाढ केली होती. नव्या वर्षात म्हणजे 2021 मध्ये आतापर्यंत पेट्रोलचे दर 3.59 रुपयांनी वाढले असून डिझेलचे दर 3.61 रुपयांनी वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर 60 डॉलर्सच्याही वर गेले आहेत. क्रूड तेलाच्या दराचा वर्षातील हा सर्वाधिक दर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER