‘इंधनदरवाढ हे केंद्र सरकारचे अपयश’ मोदींचे ९ वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट आले चर्चेत

Maharashtra Today

इंधनदरवाढीत पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. डिझेलच्या दरांचीही वाटचाल शंभरीच्या दिशेने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ९ वर्ष जुने ट्विट पुन्हा चर्चेत आले आहे. हे २०१२ सालातील आहे. गुजरातचे पंतप्रधान असताना मोदी यांनी पेट्रोल दरवाढीबाबत तत्कालीन केंद्र सरकारला धारेवर धरले होते(Fuel price hike is a failure of the central government). पेट्रोल दरवाढीमुळे गुजरातवर मोठा आर्थिक भार पडेल असे मोदी म्हणाले होते. आता इंधनाच्या दरांनी तीन आकडी संख्या गाठली असताना नेटीजन्सने मोदींना या ट्विटची आठवण करुन दिली आहे.

मोदी म्हणाले होते …

पेट्रोलच्या दरांमध्ये झालेली वाढ ही काँग्रेच्या नेतृत्वामध्ये सत्तेत असणाऱ्या युपीए सरकारचे अपयश दाखवते. यामुळे गुजरातवर हजारो कोटींचा आर्थिक भार येईल, असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले होते. हे ट्विट २३ मे २०१२ चे आहे.

आता अनेकांनी या ट्विटला रिप्लाय देणे सुरू केले आहे. सध्या झालेली इंधनदरवाढ म्हणजे आता केंद्रात सत्तेत असणाऱ्या सरकारचे अपयश नाही का, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. अनेकांनी या ट्विटखालीच मजेदार रिप्लाय दिले आहेत.

ट्विट्स –

१) दरवाढीसाठी जबाबदार कोण?

२) भक्त म्हणतील

३) जुनी ट्विट कधीतरी वाचत जा

४) जुन्या भाषणाचाही दिला संदर्भ

५) नवा दर

६) तेवढच फेका जेवढे…

७) करेक्शन…

८) गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करावे

९) दरवाढ

१०) हे कोणाचे अपयश?

११) करेक्शन पुन्हा एकदा

१२) भाजपाला मत न देण्यांनाही फटका

मोदींचे ट्विट अशाप्रकारे व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मोदींनी गुजरातचे पंतप्रधान असतानाच केलेल्या वक्तव्यांच्या व्हीडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button