इंधन दरवाढ : निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरू; राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi

दिल्ली : अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलचे (Petrol-Diesel)दर आता पुन्हा वाढू लागले आहेत. आज सतत तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझलची दरवाढ झाली. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी ‘निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरु’ असे ट्वीट केले आहे. याला त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती असा हॅशटॅग दिला आहे.

दिल्लीत आज पेट्रोल चा दर प्रति लिटर ९०.९९ रुपये आणि डिझेल ८१.४२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल ९७.३४ रुपये आणि डिझेल ८८.४९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर ९२.९० रुपये आणि डिझेल ८६.३५ रुपये आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल ९१.१४ रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये आहे.

लॉकडाऊनमुळे व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असल्याने महागाईची आणखी झळ सोसावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button