काँग्रेस सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच इंधन दरवाढ : पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

Congress - Dharmendra Pradhan

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच इंधन दरवाढ होत असल्याचा आरोप केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आज रविवारी केला. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात होणाऱ्या वाढीमागे ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलच्या किंमतीत वाढ झाली आहे. या सोबतच काँग्रेसने कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय ऑईल बॉण्ड्स जारी केले होते. याचा मोठा परिणाम किंमतीवर दिसून येत आहे.

तेल कंपन्यांना त्यांच्या उत्पानाचा मोठा भाग ऑईल बॉण्ड्सवरील व्याज चूकवण्यातच जात आहे. याचा थेट परिणाम इंधनाच्या किंमतीवर दिसून येत आहे.

कोरोनाच्या (Corona) जागतिक महारोगराई देखील इंधनदरवाढीचे मुख्य कारण असल्याचा दावा प्रधान यांच्याकडून करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधानाचे उत्पादन कमी करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे अधिक नफा कमवण्यासाठी तेल उत्पादन देशांनी कमी प्रमाणात इंधनाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. अशात ग्राहक देशांच्या समस्येत वाढ झाली असल्याचेही ते म्हणाले. इंधनदरवाढ होवू नये याकरीता भारताने ओपेक तसेच ओपेक प्लस देशांना आग्रह केला आहे. लवकरच स्थितीत बदल होईल, असा विश्वास प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER