Frozen shoulder- लगेच चिकित्सा महत्त्वाची !

Shoulder

अंससंधि म्हणजेच shoulder joint किंवा खांदा जखडणे रोजच्या दैनंदिन कामाला व्यत्यय आणणारा वेदनादायी व्याधी. खांद्यामधे थोडे दुखणे सुरु होते हळूहळू क्रियाहानी, हात वर घेण्यास कष्ट होणे, खांद्यातील वेदना हातापर्यंत तसेच बोटांपर्यंत जाणविणे, खांदा जखडणे असे त्रास सुरु होतात. रात्री वेदना वाढल्यामुळे झोप न लागण, वस्तू उचलता न येणे ही लक्षणे दिसायला लागतात.

या आजाराची कारणे 2 प्रकारे असू शकतात.

  1. बाह्य कारणे – आघात होणे, मार लागणे.
  2. आभ्यंतर कारणे – अति व सतत तिखट कडू थंड पदार्थाचे सेवन. आहारात तेल तूप दूध यांचा वापर अत्यल्प असणे.
  3. विहारसंबंधी कारणे – व्यवसाय – कम्प्यूटर मोबाईल यांचा अति वापर. यामुळे एकाच दिशेने एकाच स्थितीत तासन् तास हालचाल, हळूहळू संधि स्नायूंना जखडण्यास सुरवात करतो. व्यायाम – चुकीचा व्यायाम, अति व्यायाम अंससंधिला घातक ठरू शकतो.
  4. अति श्रम, भारवहन, जड वस्तू उचलणे, साहसिक कर्म, आपल्या शक्तिपेक्षा जास्त बलकार्य करणे, सरळ ताठ न बसणे, बसण्याच्या चुकीच्या सवयी

ही कारणे फ्रोजन शोल्डरमधे दिसू शकतात.

फ्रोजन या शब्दावरूनच आपल्याला याची चिकित्सा लक्षात येते. जिथे स्तंभ जकडणे ही क्रिया आहे तिथे अभ्यंग शेक ही चिकित्सा लगेच आराम देते. वाताची ही महत्त्वाची चिकित्सा आहेच. म्हणूनच खांदा दुखु लागल्यास सर्वप्रथम कारणांचा त्याग करणे आवश्यक आहे. वातहर तसेच बल देणाऱ्या औषधी तेलाने अभ्यंग खूप उपशय देणारे ठरते. उदा. महानारायण तेल, महाविषगर्भ तेल बलातेल इ.

  • शेक – गरम पाण्याने स्वेदन, नाडी स्वेद
  • लेप – गरम जाडसर लेप पोल्टिस बांधणे जखडलेला सांधा मोकळा करतो.
  • नस्य – उर्ध्व जत्रुगत आजारांमधे नाकात तेल सोडणे ही उत्तम चिकित्सा आहे. वैद्याच्या सल्लाने ही नक्की घ्यावी.
  • एरंडतेल रात्री झोपतांना घ्यावे. लेप मसाज शेक योग्य व्यायाम, पथ्यपाणी विनाविलंब अवश्य कराव्या.
  • आभ्यंतर औषधे – आयुर्वेदात गुग्गुळ कल्प, दशमूल रास्नायुक्त काढे यावर उत्तम कार्य करतात. मात्र याकरीता आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा.
  • खांदे जकडणे या आजाराची चिकित्सा डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घेऊन वेळीच नियंत्रणात आणावा.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER