विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यावेळी नवीन काय?

_india-women-vs-england-women-

क्रिकेटच्या प्रत्येक प्रमुख आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत काहीतरी वेगळे असते. त्या प्रयोगाचे चांगले- वाईट परिणाम होत असतात. आता ऑस्ट्रेलियात आजपासून सुरू झालेल्या महिलांच्या टि- 20 विश्वचषक स्पर्धेतही एक नवीन प्रयोग करण्यात येतोय. काय आहे हा प्रयोग..?

तर हा नवीन प्रयोग म्हणजे फ्रंट फूट नो बॉल टेक्नालाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच हे तंत्र वापरण्यात येणार आहे. यासाठी तिसरे पंच म्हणजे टेलिव्हिजन अम्पायर गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूवेळी तो पुढचे पाऊल कुठे टाकतो यावर नजर ठेवेल आणि गोलंदाजाने रेषेच्या पुढे पाऊल टाकले की मैदानातील पंचाना तो चेंडू ‘नो बॉल’ असल्याचे सांगेल असे हे तंत्र आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत सामना ‘टाय’ झाल्यास काय…?

अलीकडे बऱ्याचदा असे नो बॉल टेलिव्हिजन रिप्लेंमध्ये उघड झाल्याने पंचांनी सुरुवातीला बाद दिलेल्या फलंदाजाला परत बोलावण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने यासंदर्भात अलीकडेच भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये टेलिव्हिजन पंचांना गोलंदाजांच्या प्रत्येक चेंडूवर नजर ठेवायला सांगितले होते. त्यावेळी टाकल्या गेलेल्या 4717 चेंडूंपैकी प्रत्येक चेंडूचा निर्णय अचुक निर्णय घेता आला होता.

याशिवाय 2018 च्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे यावेळीसुध्दा डिसीजन रिव्ह्यु सिस्टीम (डीआरएस) चा वापर करण्यात येणार आहे.