कसोटी सामन्यात आता फ्रंट फूट नो बॉल टेलिव्हिजन पंचांकडे

इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakistan) दरम्यानची कसोटी क्रिकेट मालिका आजपासून सुरु होत आहे. कोरोनानंतरच्या बदललेल्या वातावरणात ही मालिका क्रिकेटमध्ये नव्या प्रयोगांची मालिका ठरणार आहे.

या मालिकेत पहिल्यांदाच फ्रंट फूट नो बॉल टेलिव्हिजन पंच देणार आहेत. मैदानातील पंचांना टेलिव्हिजन पंच अशा नो बाॕलची सूचना देतील. भविष्यात नियमीतपणे ही पध्दत लागू करण्यासाठी यावेळी चाचपणी करण्यात येणार आहे.

आयसीसी वन डे सुपर लीगच्या इंग्लंड- आयर्लंड मालिकेत हा नियम लागू करण्यात आला पण कसोटी सामन्यांमध्ये प्रथमच फ्रंट फूट नो बॉल टेलिव्हिजन पंच देणार आहेत. 2019 मधील भारत- विंडीज वन डे मालिका आणि महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही हा नियम होता.

कसोटी सामन्यांमध्ये मैदानातील पंचांकडून फ्रंट फूट नोबॉलकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आता ही जबाबदारी टेलिव्हिजन पंचांकडे सोपविण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER