आजपासून शासनाच्या नव्या गाईडलाईन, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी

Night Curfew

मुंबई :- राज्यातील वाढत्या कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सूरुवात केली आहे. आज सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार आज रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात तूर्तास लॉकडाऊन लागू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आजपासून असणार या नव्या गाईडलाईन

आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील. या ठिकाणी कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचं बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. घालून दिलेल्या नियमांचं हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

ही बातमी पण वाचा : होळी व धुलीवंदनाच्या सुटीला घरातच रहा; नितीन राऊतांचे आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER