
कोल्हापूर :- उदगाव (ता. शिरोळ) येथे शेतजमिनीचा न्यायालयीन वाद असताना जेसीबीने घर जमीनदोस्त केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी संतोष मनोहर खामकर यांच्यासह १८ जणांवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तर घर जमीनदोस्त केल्याने उदगाव येथे तणावपूर्ण वातावरण बनले होते. याबाबतची फिर्याद सौ प्रीती मेघराज कोळी (वय २६, रा. उदगाव) यांनी दिली आहे.
चिंचवाड मार्गावर गट नंबर ५२७ मध्ये शेतजमिनीवरून न्यायालयात वाद आहे. सोमवारी सकाळी संतोष खामकर असताना त्यांनी खामकर यास विरोध केला. यावेळी वादावादी होऊन सौ. कोळी यांना मारहाण करून विनयभंग केला. सायंकाळी सौ. कोळी यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्य शिरोळ तहसीलदार कार्यालयात गेले असता संतोष खामकर, जुलेखा मुलाणी यांच्यासह ८ ते १० जणांनी सासू पुष्पाताई कोळी यांना शिवीगाळ व मारहाण करून घरातून बाहेर काढून यांच्यासह पाचजण सौ. कोळी यांच्या शेतात ट्रॅक्टर मारत जेसीबीने राहते घर, जनावरांचा गोठा, शौचालय, बाथरूम, पत्र्याचे शेड जमीनदोस्त केले. यामध्ये सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने संतोष मनोहर खामकर, निसार इनामदार, अक्षय जंगम, इरफान शेख, कदम, जुलेखा मुलाणी सर्व ( रा. जयसिंगपूर) वैशाली व दोन अनोळखी महिला, तसेच ८ ते ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
ही बातमी पण वाचा : कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचा एल्गार : कोल्हापूर बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला