शिवसेना भवनातून कलाकारांना फोन, पैसे देऊन ट्विट करवून घेतात; नितेश राणेंचा आरोप

CM Uddhav Thackeray - Nitesh Rane

मुंबई :- कोरोनाची (Corona) परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार (Thackeray Government) अपयशी ठरले आहे. मात्र कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट करवून घेते. अनेक सेलिब्रिटी अचानक महाराष्ट्र सरकारबद्दल चांगलं लिहायला लागलेत, हे सरळ सरळ पीआर कॅम्पेन आहे. त्यासाठी शिवसेना भवनावरून अनेक कलाकारांना फोन केले जातात, असा गंभीर आरोप भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.

नितेश राणे यांनी गुरुवारी मुंबईत ‘टीव्ही-९ मराठी’शी बोलताना यासंदर्भात विधान केले. सरकारी तिजोरीत पैशांची चणचण असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सोशल मीडिया अकाउंट्स सांभाळण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करण्यास मंजुरी देते. तसेच ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले.

आगामी अधिवेशनात मी हे सर्व पुरावे सादर करून सर्वांना उघडं पाडणार आहे. कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आलेत, किती बिलं झालीत, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. छोट्या कलाकारांना ट्विट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त पैसे दिले जातात. त्यासाठी थेट सेना भवनातून या बॉलिवूड सेलिब्रिटींना फोन केले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी असेल तर लॉकडाऊन ३१ मेपर्यंत का वाढवण्यात आला, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारकडून कोरोनाचे खरे आकडे लपवले जात आहे. त्यांना राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे. बेड्स आणि ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लॉकडाऊन हटवण्याची हिंमत नाही. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या खरोखरच कमी झाली असती तर अनलॉक झाले पाहिजे होते. दुकाने आणि इतर व्यवहार सुरू करायला परवानगी दिली पाहिजे होती. पावसाळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मग उरलेल्या १५ दिवसांत लोकांना पैसे कमवू द्यायचे होते. मात्र, मुळातच मुंबई मॉडेल फसवे असल्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढवल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.

सौजन्य : TV9 Marathi
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button