सांगलीतून भाजपला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरूवात, ही घटना चांगली – शरद पवार

Sharad Pawar - NCP

सांगली : भाजपने लोकमताचा अनादर करून काही राज्यात सत्ता काबीज केली, त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची सुरुवात सांगलीतून झाली. ही चांगली घटना आहे. आता सर्वांना विश्वासात घेउन विकासाची कामे करा, असा महत्वपूर्ण सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार ( Sharad Pawar)यांनी दिला. सांगली महापालिकेत बहुमत असतानाही भाजप उमेदवारांचा पराभव करीत काँग्रेसच्या मदतीने सत्तांतर घडवून आणल्यानंतर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासोबत शनिवारी पवार यांची बारामती येथे भेट घेतली.

या वेळी पवार यांनी भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी आखलेल्या राणीनीतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. महापौर निवडीवेळी किती सदस्यांनी आघाडीच्या बाजूने मतदान केले, किती गैरहजर राहिले याची विचारणा केली. आघाडीला मदत करणाऱ्यांनाही विकासकामे करीत असताना विश्वाासात घ्या, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. भाजपने ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर हल्ले करीत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले, त्यांना चोख प्रत्युत्तर सांगलीतून मिळाले असून ही सुरुवात आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे याही उपस्थित होत्या.

सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी खा. शरद पवार यांची भेट घेऊन सत्तांतरावेळी घडलेल्या घडामोडीची माहिती दिली. या वेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे या उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER