सचिन वाझेंवरुन सत्ताधारी बॅकफूटवर ; संकटमोचक शरद पवार पुन्हा आले धावून ‘हा’ दिला महत्वाचा सल्ला

Sharad pawar

मुंबई : हिरेन मनसुख प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले . फडणवीसांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे महाविकासआघाडी बॅकफूटवर गेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेले पुरावे आणि विषयाच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना मंगळवारी सभागृहात नेमकं काय उत्तर द्यायचं हेच कळेनासे झाले होते. या पार्श्वभूमवीर आता महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे शिल्पकार आणि संकटमोचक शरद पवार (Sharad Pawar) मदतीसाठी धावून आले आहेत.

सचिन वाझे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन मंगळवारी भाजपच्या आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले होते. या गदारोळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे समजते.

या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी अजित पवार आणि अनिल देशमुख यांना महत्त्वाचा सल्ला दिल्याचे समजते. त्यामुळे आज सभागृहात सत्ताधाऱ्यांची रणनीती नेमकी काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आज सभागृहात बजेट मंजूर करून घेणे, हाच एकमेव अजेंडा ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER