कंगना रणौत ते राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल कोश्यारींनी स्पष्टच सुनावले

Kangana Ranaut & Bhagat Singh Koshyari

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) प्रकरणाशी माझे काही देणे-घेणे नाही. कंगना रणौत प्रकरणावर मी कधी नाराज होतो असे म्हटले, जे नाराज असतील त्यांनीच ते छापले असेल. राज्य सरकारच राज्यपाल नियुक्त आमदारांची नावं पाठवत असेल तर नियुक्तीचा प्रश्न येतोच कुठे? अशा विविध विषयांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कंगना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला आहे. यावर राज्यपाल कोश्यारी नाराज असल्याची चर्चाही रंगली होती. त्यावर आज राज्यपाल कोश्यारी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कॉफीटेबल बुकचं आज दुपारी ४ वाजता प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले व राज्य सरकारच्या काही चुकादेखील त्यांनी लक्षात आणून दिल्या आहेत.

राज्यपाल नियुक्त आमदार
राज्यपाल नियुक्त आमदारांवरून कोश्यारी यांनी सरकारला टोला लगावला आहे. ते म्हणाले, ज्यांना नाव पाठवायचं आहे ते नाव पाठवत नाही आणि राज्यपालांना शिव्या देणार हे बरोबर नाही. मुद्देही सुस्त गवाह चुस्त अशा शब्दांत राज्यपालांनी सरकारला टोला लगावला. १२ राज्यपाल नियुक्त आमदारांवर राज्यपाल म्हणाले, मला नावं त्यांनी पाठवली  तर नियुक्ती प्रश्न येतोच कोठे ?

कंगनाच्या प्रकरणाशी माझे काही देणे-घेणे नाही
कंगनाच्या प्रकरणाशी माझं काही देणं-घेणं नाही. मी कधी म्हटलं मी नाराज होतो, असा खोचक  प्रश्नही राज्यपाल कोश्यारी यांनी केला. ते म्हणाले, मी कुणाच्या कामात हस्तक्षेप करत नाही, कोणी विचारलं तर करतो नाही तर नाही. पहाटेच्या शपथविधीवर म्हणाले, पहाटेला रामप्रहर म्हणतात, मग कोणी पहाटे शपथ घेतली तर प्रहार का करतात? असा प्रश्न  राज्यपालांनी केला. तसेच ते म्हणाले, राज्यपाल आणि सरकार यांच्यात मतभेद नाही; पण दोन भांडी असेल तर, काही तर वाजणार.

माझा मतभेद नाही, माझे सगळे मित्र. राज्यात कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद पेटलेला आहे. शिवसेनेनेही एका अभिनेत्रीच्या ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्याने हा वाद अधिकच चिघळत गेला. एवढेच नाही तर शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझर चालवल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेवर टीका होऊ लागली. त्यातच कंगना रणौत प्रकरणावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नाराज असल्याची वार्ता वा-यासारखी पसरली. त्यावर आज राज्यपाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER