
अभिनेता अमिताभ बच्चन यांचा लक्झरी बंगला ‘जलसा’ किंवा मुकेश अंबानी यांचा ‘अँटिलिया’ मुंबईत या सेलिब्रिटींचे घर आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक सितारे आहेत ज्यांचे चाहते त्यांच्या घरांना पाहण्यासाठी दूरदूरपर्यंत पोहोचतात. तर, आज आपण मुंबईतील सर्वात महागड्या घरांपैकी अशा मोठ्या व्यक्तींच्या घरांबद्दल जाणून घेघूया.
अमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’ मुंबईच्या जुहूमध्ये आहे. ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह येथे राहतात. अमिताभ यांचा बंगला पर्यटनस्थळासारखा झाला आहे. देशभरातून लोक मुंबईला गेले तर ते नक्कीच अमिताभ यांचा बंगला बंगला बघायला जातात. चाहते दर रविवारी त्यांना भेटायला जातात. बिग बी देखील त्यांच्या चाहत्यांना निराश करत नाही.
अमिताभप्रमाणेच शाहरुख खान देखील बऱ्याचदा बंगल्याच्या वरच्या ठिकाणी आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी उभा राहतो. शाहरुख खानच्या बंगल्याचा नाव ‘मन्नत’ आहे. हा बंगला शाहरुखची पत्नी गौरी खानने सजवले आहे. गौरी एक इंटिरियर डिझायनर आहे. या बंगल्याला पूर्वी व्हिला व्हिएन्ना म्हणून ओळखले जात असे.
मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जातात. अशा परिस्थितीत त्यांचा घर जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान घरांमध्येही आहे. मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’ कुठल्याही राजवाड्यापेक्षा काही कमी नाही. संपूर्ण कुटुंब बॉलिवूड स्टार्ससमवेत बर्याचदा पाहिले जाते. हे घर शिकागो येथील आर्किटेक्ट पार्किन्स अँड विल यांनी बनवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे घर मिथिकल अटलांटिक बेटाद्वारे (Mythical Atlantic Island) प्रेरित होऊन बनवले आहे.
प्रत्येकाला मुंबईच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटचे नाव माहितच असेल. सलमान खान संपूर्ण कुटुंबासमवेत इथे राहतो. दिवाळी असो, ईद असो किंवा इतर काही खास प्रसंग असो, बाल्कनीतून सलमान आपल्या चाहत्यांचे अभिवादन स्वीकारतो. अमिताभ आणि शाहरुखप्रमाणे सलमान खानचे अपार्टमेंटही पर्यटनस्थळासारखे आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला