इजिप्तपासून-भारतापर्यंत राजदरबार सोडून सर्कसपर्यंत कसं पोहचलं जोकर नावाचं पात्र?

Maharashtra Today

विदुषकांच्या जडण घडणीचा इतिहास २४०० वर्षांपुर्वीपासूनचा आहे. त्यांच्या अस्तित्त्वाची सुरुवात प्राचीन इजिप्तपासून झाली. मध्यकाळात जगभरात विदुषकांचा प्रभाव पडला. शाही दरबारातील लोकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी विदुषकांवर असायची. शाही दरबार ते सर्कस असा प्रवास विदुषकांचा राहिलेला आहे. यानंतर ग्रीक आणि रोमन साम्राज्यात विदुषकी कलेला राजाश्रय मिळाला. रोजच्या दैनंदिन गोष्टी विनोदाच्या मार्गाने मांडत विदुषकांनी राजदरबारात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. अधुनिक काळात विदुषकी कलेला नव्या पद्धतीनं जगासमोर मांडल ते ‘जोसेफ ग्रीमल्दी'(Joseph Grimaldi)ने. जोसेफ लंडनमध्ये राहणारा एक व्यक्ती होता ज्यानं नव्या काळातल्या ‘जोकर’चा अविष्करा केला.

सुरुवातीच्या काळात सर्कस-विदूषक (Circus)हे कुशल कसरतपटू व घोडेस्वार होते, तसेच सुरुवातीला ते गाणारी-बोलणारी विनोदी पात्रे म्हणून काम करत होते. खर्याअ सर्कस-विदूषकाचा सर्वांत आधीचा आविष्कार जोसेफ ग्रिमाल्डी (१७७८-१८३७) या इंग्लिश नटाने घडवला. कोलांड्या उड्या मारणं, धडपडणं, पोकळ बांबूनं फटके मारणं इ. शारीर विदूषकी कामं तो अतिशय पटाइत असायचा. त्याची विदूषकाची भूमिका व रंगभूषा पुढे सर्कसमध्ये अवतीर्ण झाली. कोम्मेदीआ प्रकाराकील झान्नी, धूर्त कोटीबाज हर्लेक्वीन, बेडौल, चमत्कारिक पेद्रोलिनो या पारंपारिक व्यक्तिरेखांचाही आधुनिक विदूषकाच्या जडणघडणीत वाटा आहे. सैल घोळदार चोळणा, सैलसर ढगळ अंगरखा व रुंदी कडांची टोकेरी वा शंकाकृती हॅट ही विदूषकी वेषभूषेची खास वैशिष्ट्ये या परंपरेतूनच आली आहेत. एकोणिसाव्या शतकातील सर्वांत लोकप्रिय अमेरिकन सर्कसपटू विदूषक डॅन राइस (१८२३-१९००) हा नृत्य, गायन, संभाषणचातुर्य, शारीर कसरती व चलाख्या, करामती इत्यादींद्वारा लोकांच मनोरंजक विदुषक करत होता.

जोसेफ ग्रीमाल्डी

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला विनोद केवळ मौखिक न राहता तो शारिरीक झाला. वेगवेगळ्या वेशभुषा करत विनोद करण्याची आणि चेहऱ्यावर रंगरंगोटी करुन भूमिका वटवण्याची ती सुरुवात होती. रंगेबेरंगी कपडे घालून आजचा जो जोकर तुम्हा आम्हाला माहिती आहे तो निर्माण केला होता जोसेफ यांनी. ते स्वतः मोठ्या संघर्षमयी आणि दुखी जीवन जगत होते. वडील क्रुर होते. त्यामुळं बालपण भीतीत गेलं. तरुण वयात ते ज्या महिलेवर प्रेम करत होते तिचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. दुसरा मुलगा वयाच्या ३१ व्या वर्षी नशेमुळे मरन पावला. त्याच्या वाटेला आलेल्या या सर्व वाईट बाबी त्याचं अस्तित्त्व संपवायला पुरेशा होत्या. परंतू ते स्वतः ही दुःखावर हसले आणि इतरांनाही हसवलं जोसेफ मुळं जगाला विदुषकाला अधुनिक पद्धतीने पाहता आलं. राजदरबारात लोप पावलेला विदुषक सामान्यांसमोर सर्कसच्या मार्फत आणण्याचं काम जोसेफ यांनी केलं.

संस्कृत नाटकातला विदुषक

भारताला लाभलेली हजारो वर्षांची परंपरा आणि त्यात विकसीत होत गेलेली नाटकं, पात्रं, कथानकं आणि साहित्य यांनी वेळोवेळी नावीन्य स्वीकारलं. भारताच्या नाट्यशास्त्रात प्राचीन संस्कृत रंगभूमीवरील प्रमुख पात्रांच्या जोडीचे लोकप्रिय विनोदी पात्र म्हणून विदूषकाचा सामावेश केल्याचं आढळतं. ‘दूष’ (दूषणे देणे, दोष दाखविणे, बिघडवून टाकणे) या शब्दावरून त्याची उत्पत्ती झाल्याचं सांगितलं जातं. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने दोष दाखविणारा आणि सरळ असलेले बिघडून टाकणारा, असं ते नाटकातलं पात्रं. विदुषक स्पष्टवक्ता टीकावर व हसवणारा विनोदवीर म्हणून या दोन्ही भूमिका तो वटवायचा.

विदुषकांचा हा प्रवास रंजक आहे. राजदरबारतून ते थेट जनतेपर्यंत पोहचले. आज भारतासह जगभरात ओटीटी आणि सिनेमांमुळं या पारंपारिक कलेवर मंदी आणि कलाकारांच्या पोटावर पाय आलाय. त्यांच्या प्रतिभेच्या तुलनेत त्यांना परतावाही मिळत नाहीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button