ब्रिस्बेनपासून (क्रिकेटपासून) चंदनापुरीपर्यंत (ग्रा.पं.) रहाणेंचाच गुलाल!

Ajinkya Rahane - Brisbane - Chandanapuri

ब्रिस्बेन : भारताने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा (India Beat Australia) धुव्वा उडवला. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) टीम इंडियाने (Team India Win) ३ विकेट्स राखून विजय मिळवला. मालिकाही २-१ ने जिंकली. त्याआधी ग्रामपंचायत निवडणुकीत रहाणेच्या चंदनापुरी गावात रहाणे पॅनलनेही दणदणीत विजय मिळवला.

अजिंक्य रहाणे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातला आहे. चंदनापुरी (Ajinkya Rahane Village Chandnapuri) हे त्याचे गाव. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. चंदनापुरीत रहाणेंच्या पॅनलने विजय मिळवला. ही १३ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. या गावात बहुसंख्य लोक रहाणे आडनावाचे आहेत. या निवडणुकीत अजिंक्य रहाणेच्या घरातील किंवा नातेवाईक कोणीही उमेदवार नव्हते; पण रामनाथ रहाणे अर्थात आर. बी. शेठ रहाणे यांच्या शेतकरी विकास मंडळाने १३ पैकी १० जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली. चंदनापुरी हे गाव रहाणेंचे गाव म्हणून ओळखले जाते.

आजी झेलूबाईचा लाडका
अजिंक्य रहाणे हा आजी झेलूबाई यांचा लाडका नातू आहे. अजिंक्य रहाणेच्या गावातील बंगल्याचे नावही ‘झेलू’ आहे. झेलू आजीने वयाची शंभरी पूर्ण केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत झेलू आजीनेही मतदान केले आहे.

ही बातमी पण वाचा : ये नया भारत है…घर में घुसकर मारता है! सेहवागने टीम इंडियाचे केले हटके अभिनंदन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER