धनुष्यबाण ते हवाबाण! पुरावे द्या आणि मोकळे व्हा, कर नाही त्याला डर कशाला? – भातखळकर

Sanjay Raut & Atul Bhatkhalkar

मुंबई :- शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी समन्स बजावले. यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार टीका केली. राऊतांच्या टीकेची टिंगल करताना भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणालेत, संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. केवळ तोंडाच्या वाफा.

भातखळकर यांनी याचा व्हिडीओ ट्विट केला – “संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. केवळ तोंडाच्या वाफा. पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला? वैफल्यग्रस्ततेने आज त्यांनी अनेक सवंग पद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडले तर केंद्र सरकारला हादरे बसतील… तुमचं तोंड दाबलयं कुणी? उघडाना तोंड. जे मनात येईल ते बोला. तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. संजय राऊत कर नाही त्याला  डर असायचे कारण नाही. थेट पुरावे द्या, ईडीच्या नोटीसला उत्तर द्या. भाजपावर आरोप करण्याचे धंदे व उद्योग बंद करा. कंपाउंडरकडून औषध घेता, आता एमडी डॉक्टरकडून घ्या, म्हणजे तुमची मनःस्थिती थोडी ठीक होईल.

ही बातमी पण वाचा : बायकांच्या पदराआडून लढाई का? संजय राऊतांच्या सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER