एप्रिलपासून धीम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल धावणार

local Train

मुंबई :- पश्चिम रेल्वेने एप्रिलपासून अंधेरी ते विरार दरम्यान १५ डब्यांची लोकल धीम्या मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान येणाऱ्या सगळ्या स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम हाती घेतले होते. जवळपास ७० कोटी रुपयांचे हे काम पूर्णत्वास आले आहे.

सध्या पश्चिम रेल्वे १२ डब्यांच्या लोकल धीम्या मार्गावर चालवते. जलद मार्गावर मात्र १५ डब्यांच्या गाड्या चालवण्यात येतात. अंधेरी ते विरार मार्गावर १४ स्थानकांतील ३१ फलाटांची लांबी वाढवणे आवश्यक होते. सध्या हे काम सुरू आहे. पश्चिम रेल्वे १५ डबे असलेल्या लोकलच्या ५४ फेऱ्या चालवतात. या रेल्वेला धीम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी २४ फेऱ्या चालवाव्या लागणार आहेत. यासाठी त्यांना ४२ अतिरिक्त डब्यांची गरज आहे. रेल्वे बोर्डाकडे अतिरिक्त डब्यांची मागणीसुद्धा केली आहे, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. १५ डब्यांची लोकल सुरू झाल्यास रेल्वेमार्गावरील एका लोकल ट्रेनची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे.

२००९ साली पश्चिम रेल्वेने १५ डब्यांच्या लोकलची सुरुवात दादर आणि विरार येथून झाली होती. २८ जानेवारी २०११ पासून या सेवेचा विस्तार चर्चगेटपर्यंत करण्यात आला होता. दादर आणि चर्चगेट दरम्यान १५ डब्यांची लोकल थांबत नव्हती. या दोन स्थानकांमधील जी स्थानके येतात त्यांच्या फलाटांची लांबी १५ डब्यांची लोकल थांबवण्याइतकी पुरेशी नव्हती. या स्थानकांदरम्यान १५ डब्यांच्या लोकल धीम्या मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER