बालकलाकार ते उत्तम अभिनेता कोण आहे हा मराठमोळा चेहरा

Umesh Kamant

बालरंगभूमी वरून अभिनयात पदार्पण केलेला अभिनेता ” उमेश कामत ” (Umesh Kamant). नाटक , चित्रपट आणि मालिका अश्या विविध क्षेत्रातुन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला तरुण अभिनेता म्हणून आज उमेश ओळखला जातो. अभिनयात एक बालकलाकार म्हणून एन्ट्री करून आज वेब क्षेत्रात देखील त्याने एक वेगळीच छाप पाडली आहे. प्रत्येक कलाकार हा ठरवून अभिनयात पदार्पण करत नसतो तर काही कलाकार हे अचानक अभिनय क्षेत्रात येतात. असचं काहीस अभिनेता उमेश कामत च देखील आहे. अभिनयात आपली अनोखी ओळख संपादन आज उमेश ने केली आहे. प्रायोगिक रंगभूमी ते  चित्रपट , मालिका असा अनोखा पल्ला त्याने गाठला. उमेश चा या क्षेत्रात येण्याचा प्रवास नक्की कसा होता जाणून घेऊ या ….

” अचानक या क्षेत्रात आलो “

कलाकार व्हायचं हे कधीच ठरवलं नव्हत मी जेव्हा लहान होतो तेव्हा ” सोनचाफा ” (Sonchafa) या बालनाटका पासून माझ्या करियर ची सुरवात झाली. शाळेत असताना छोटे – मोठे रोल करायचो. मग एखादी मालिका , नाटक असं सगळं सुरू होत. सातवीत मी एक मालिका केली तर हे सगळं सुरू होत.कॉलेज मध्ये असताना मी करियर म्हणून या क्षेत्राकडे कधीच पाहिलं नव्हत तेव्हा फक्त आंतर कॉलेज स्पर्धा केल्या तेव्हा तिथे कुठेतरी जाणवलं की आपल्याला हे करण्यात मज्जा येते. अभिनयाची आवड इथे लागली हा एक चस्का इथेच लागला असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थाने मी तेव्हा सुद्धा मी करियर म्हणून या क्षेत्राकडे पाहिलं नव्हत. तेव्हा सुद्धा आपल्याला अभिनय , नाटक करून मज्जा येते हे काम आपण एन्जॉय करतोय असं वाटत होतं. एकांकिका, नाटक हे सुरू होत मग पदवी कॉलेज संपलं आणि मग मी पुन्हा नाटक करायला मिळावं म्हणून मी एमकॉम ला ऍडमिशन घेतलं. पोदार मधून मग मी रणांगण ही एकांकिका केली मग पुढे हा प्रवास सुरु झाला. इथून नाटक करत करत चित्रपट , मालिका करत राहिलो. नाटक करून मला एक वेगळाच आनंद मिळतो कारण एखादं नाटक करून आपण प्रेक्षकांना खूप वेगळं सुख देतो असं मला वाटतं. नाटकं हे माझं खरं पहिलं प्रेम आहे ! नाटकाचा प्रयोग झाल्यावर आपल्याला एक लाईव्ह प्रतिसाद मिळतो तर हे बघणं खूप सुख असतं नाटक करताना त्यात वेगवेगळे फ्लेवर्स आलेले मला आवडतात. प्रेक्षकांना आपलं नाटक बघून आनंद मिळाला पाहिजे हे माझं मत असत त्यामुळे नाटक असं असावं जे प्रेक्षकांना काहीतरी देऊन जाईन.प्रत्येक प्रोजेक्ट साठी वेगळा प्रयन्त करावा लागतो. अगदी संवाद , अभिनय या सगळ्या बाबी लक्षात घेऊन नाटक हे केलं जातंय.नाटक , चित्रपट , मालिका , वेब सीरिज ((Web Series) या सगळ्या गोष्टी एक कलाकार म्हणून मला खूप काही शिकवून जातात.

आजवर उमेश कामत ने खूप उत्तम काम केलंय. ” आभाळमाया , ऋणानुबंध , असंभव , एका लग्नाची दुसरी-तिसरी गोष्ट या सारख्या गाजलेल्या मालिका सोबत धुरळा , लग्न पाहावे करून ,टाईम प्लीज सारखे कमालीचे चित्रपपटातुन विविध भूमीका अगदी चोख पणे उमेश ने पार पाडले आहेत. ” सोनचाफा , स्वामी , रणांगण , डोन्ट वरी बी हॅप्पी , दादा एक गुड न्यूज अश्या विविध नाटकातून आणि अनेक चित्रपट मालिका मधून प्रेक्षकांच मनोरंजन करताना उमेश कामत ने आज स्वतःची मराठी इंडस्ट्रीत एक वेगळीच ओळख संपादन केली आहे. सातासमुद्रापार जाऊन आपल्या नाटकाचे विविध प्रयोग केलेला हा अभिनेता आहे. अभिनयात वेगवेगळ्या भूमिका बजावून प्रेक्षकांची मन त्याने आजवर जिंकली आहेत.

” अजून काय हवं ” अश्या भन्नाट वेब सिरीज मधून त्याने मराठी वेब सीरिज ला एक वेगळा चेहरा दिला आहे. अभिनय संपन्न असा अभिनेता असून अभिनयात अचानक एंट्री घेतलेला हा बालकलाकार ते एक उत्तम अभिनेता म्हणून उमेश कामत आज ओळखला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER