सोशल मीडियावर फ्रेंडशिप डेची धूम

Friendshipday

मुंबई :- आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे जगभरातील देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. २७ एप्रिल २०११ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ३० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, भारतासह कित्येक देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात जवळचं नातं म्हणजे मित्र.

माया, प्रेम, जिव्हाळा असलेल्या या नात्याची आपण स्वतःहून निवड करतो. या नात्याला कोणतीही बंधन नसतात. अटी-शर्तीपलिकडील हे नातं निराळंच असतं. मित्रमैत्रिणी कायम सोबत नसले तरीही या नात्यात दुरावा येत नाही. मैत्री या दोन अक्षरी शब्दामध्ये भरपूर ताकद आहे. मित्रमैत्रिणींवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची आवश्यकता नसते. आज कोरोना महामारीच्या सावटातही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं हा दिवस साजरा साजरा केला. ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी यंदा नवनवीन प्लान आखले. सकाळपासूनच फ्रेंडशिप डे निमित्त करणाऱ्या मेसेज नाही मित्र-मैत्रिणींचे बॉक्स भरून गेले.

कोरोना (Corona) संसर्ग नव्हता त्यावेळी पिकनिक, ट्रेक किंवा एकमेकांच्या घरी जाऊन मैत्री दिवस साजरा केला जात होता. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी एकमेकांना चॉकलेट, ग्रीटिंग कार्ड, फ्रेंडशिप बँड देऊन हा दिवस साजरा करत. मात्र आजचा फ्रेंडशिप डे या सगळ्याला फाटा देणारा ठरला.

मेसेजसह मित्रांवर अनेकांनी कविता लिहून ती सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यांची जागा तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाची आणि खास आहे, हे शब्दांमध्ये मांडले. स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून पाठवली होती. लाकडं घरीच असलेल्या नेत्यांनी फ्रेंडशिप डे निमित्त हँडमेड गिफ्ट तयार केले. आणि ते आपल्या खास मित्र मैत्रिणींना भेट दिली. काहींनी मैत्रींच्या प्रवासातील आठवणींना उजाळा देत एखादा भन्नाट व्हिडीओ तयार केला होता. एकूणच कोरोणात महामारी च्या पार्श्वभूमीवर फ्रेंडशिप डेचा ट्रेण्ड बदलला. मित्रा प्रति प्रेम व्यक्त करण्याची परिभाषा बदलली तरी उत्साह मात्र तसूभरही कमी झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER