कोरोना नियंत्रणात आल्यावर अंगणवाडी केंद्रात ताजा आहार सुरू होणार : यशोमती ठाकूर

Yashomati Thakur

मुंबई : राज्यात कोरोनामुळे (Corona) अंगणवाडीतील मुले व गर्भवती महिलांना पौष्टिक आहार देण्याचे कंत्राट महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह स्टेट फाउंडेशनला देण्यात आले आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्थानिक महिला गट व बचत गटांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रात ताजे आहार सुरू करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबतचा प्रश्न सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री ठाकूर म्हणाल्या की, गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे अंगणवाडी स्तरावरील ताज्या आहाराऐवजी घरपोच आहार पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाड्या सुरू करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने आपातकालीन व्यवस्थापन विभागाला प्रस्ताव पाठविला आहे.

पुढील आदेशापर्यंत अंगणवाडी केंद्रे सुरू होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ताज्या आहाराऐवजी घरपोच आहार सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना प्रादुर्भाव संपुष्टात आल्यावर अंगणवाडी केंद्र सुरू होईल. त्यानंतर महिला मंडळ व बचत गटांमार्फत अंगणवाडीत ताजा आहार सुरू होईल, असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER