पांगोंग ताओ येथे भारत आणि चिनी सैन्यांत चकमक, भारतीय सैन्यांनी चीनींचा डाव उधळला

Pangong Tao

लडाख: भारत (India) आणि चीनच्या (China) सैन्यामध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती एएनआयने (ANI) दिली आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग (Pangong) तलाव परिसरात चिनी सैनिकांनी २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

गलव्हान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.

चीननं भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी चीनी सैन्याचा डाव उधळून लावल्याची माहिती आहे. गलवान खोऱ्यानंतर चीननं आपलं सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केलं होतं. चीन कुरापतींवर भारतीय सैन्याची नजर होती. त्यामुळे वेळीच भारतीय सैन्यांना चीनी सैन्यांचा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.

भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही गोष्टींबद्दल सहमती झाली होती. त्यांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER