फ्रेंच ओपन : राफेल नदालच विक्रमी तेरावा विजय, नोव्हाक जोकोविच पराभूत

Rafael Nadal

पॅरिस :- जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राफेल नदालने अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविच पराभव करत विक्रमी १३ वे फ्रेंच ओपन जिंकले. याचबरोबर त्याने रॉजर फेडरर सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. याचबरोबर स्पेनच्या या टेनिसपटूने फ्रेंच ओपनमध्ये १०० सामने जिंकण्याचाही विश्वविक्रम केला.

फ्रेंच ओपन का बादशाह असलेल्या राफेल नदालने आजच्या सामन्यातही आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. त्याने जोकोविच विरुद्धचा पहिला सेट ६ ० ने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही जोकोविचला प्रतिकाराची साधी संधीही न देता त्याने हा सेट ६ २ असा आपल्या नावावर केला. या दोन गेम वाईट पद्धतीने हारल्यानंतर जोकोविच दुसऱ्या सेटमध्ये भानावर आला आणि त्याने नदालला प्रतिकार केला. पण, क्ले कोर्टचा बादशाह नदालने त्याचे हे आव्हान ७ – ५ असे मोडून काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER