राज्यात १८ ते ४४ वर्षांच्या प्रत्येकाला मोफत लसीकरण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Uddhav Thackeray - Coronavirus Vaccine

मुंबई :- कोरोना (Corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. महाराष्ट्रात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण (Vaccination) करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. ५ कोटी ७१ लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. लसीकरण करण्यासाठी महाराष्ट्राला १२ कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे.

त्यासाठी राज्य सरकार ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या ४५ वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे. मात्र, राज्याच्या अनेक भागांत  लसींचा तुटवडा भासत असल्यामुळे सरकारला मुबलक लसी व कर्मचारी वर्ग यांची सोय करावी लागणार आहे. दरम्यान, लसीकरणाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत आहेत. नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ४५ वर्षांवरील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण केले आहे. हा देशात विक्रम आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली. सध्या राज्यासमोर आर्थिक अडचण आहे. नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्या वाढवा; देवेंद्र फडणवीसचे आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button