कोल्हापूर शहरात दहा ठिकाणी होणार मोफत स्वॅब तपासणी

Swab Test

कोल्हापूर : शहरातील आयसोलेशन हॉस्पिटलसह दहा कुटुंब कल्याण केंद्राच्या ठिकाणी शहरातील नागरिकांचे मोफत स्वॅब घेण्याची सुविधा करण्यात आली आहे. शहरातील लोकांची कोरोना टेस्ट घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आतापर्यंत सीपीआर आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथे मोफत स्वॅब सुविधा उपलब्ध केली होती. शहरवासियांची मागणी आणि रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महानगरपालिकेने आता सीपीआर आणि आयसोलेशन पाठोपाठ शहरातील दहा कुटुंब कल्याण केंद्राच्या ठिकाणी मोफत स्वॅब घेण्याचे नियोजन केले आहे.

मोफत स्वॅब घेण्यासाठी शहरात निश्चित केलेल्या दहा कुटुंब कल्याण केंद्रामध्ये कुटुंब कल्याण केंद्र फिरंगाई हॉस्पिटल, कुटुंब कल्याण केंद्र राजारामपुरी, कुटुंब कल्याण केंद्र कसबा बावडा, कुटुंब कल्याण केंद्र महाडीक माळ, कुटुंब कल्याण केंद्र फुलेवाडी, कुटुंब कल्याण केंद्र सदर बाजार, कुटुंब कल्याण केंद्र सिध्दार्थनगर, कुटुंब कल्याण केंद्र मोरेमाने नगर यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER