मराठा तरुणांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण

Maratha youth

पुणे (प्रतिनिधी) :- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने बँकींग स्पर्धा परीक्षेसाठी मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या आर्थिकदृष्ट्या मागास गटातील उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येतील. या अर्जाची अंतिम मुदत सात नोव्हेंबर असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांनी दिली.

विविध राष्ट्रीयकृत बँकांमधे नोकरीसाठी डिसेंबर २०१९ मधे स्पर्धा परीक्षा होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, अकोला, परभणी, नागपूर, नाशिक, पुणे, बीड, बुलडाणा, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी सारथीतर्फे तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत. यात सहभागी विद्यार्थ्यांना तेवीसशे रुपये किंमतीच्या पाच पुस्तकांचा संच मोफत दिला जाणार आहे. प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार प्रवेश देण्यात येईल. त्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सारथीच्या संकेतस्थळावरील नोटीस बोर्डमधील आयबीपीएमस कोचिंग लिंक पाहून अर्ज करावा, असे आवाहन परिहार यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : गौतम नवलखा यांच्या अर्जावर गुरुवारी निकाल