२१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण मोफत; केंद्राची मोठी घोषणा

PM Modi - Maharashtra Today

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित करताना काही घोषणा केली आहे. भारतात गेल्या शंभर वर्षात अशी महामारी आली नव्हती. या संकटाचा सामना करताना भारताने एका वर्षात दोन ‘मेड इन इंडिया’ व्हॅक्सिन बनवल्या. आता लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी केंद्राची असेल. २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या घोषणेमुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचे संकट आणि सरकारने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. “गेल्या १०० वर्षात अशी महामारी आली नाही. देशाने या संकटाचा अनेक आघाड्यांवर सामना केला आहे. गेल्या दीड वर्षात ‘हेल्थ केअर स्ट्रक्चर’ वाढवण्यात आले. जगातील कानाकोपऱ्यातून जे काही आणणे शक्य झाले ते आणून या संकटाचा सामना केला.” असे मोदी म्हणाले.

येत्या २१ जूनपासून भारतात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. यासाठी राज्यांना एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. ज्यांना मोफत लस नको असेल, त्यांना खासगी रुग्णालयात १५० रुपये भरून लस घेता येईल, असे मोदींनी स्पष्ट केले.

नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार

कोरोना काळात अनेक जण आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. या संकटात देशातील नागरिकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळण्याची सुविधा केली होती. हीच सुविधा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही कायम राहणार आहे. पुढे दिवाळीपर्यंत नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे, अशी घोषणा मोदींनी केली आहे.

८० कोटीहून अधिक नागरिकांना आतापर्यंत मोफत धान्य दिले आहे. ही सुविधा नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिक आता PM गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य घेऊ शकतात. देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये. तसेच देशातील गरीब जनतेसोबत त्यांचे साथी बनून सरकार खंबीरपणे उभे असल्याचे मोदी म्हणाले.

लसीकरणाला ४० वर्ष लागले असते

कोरोना विरोधात कोविड प्रोटोकॉल आणि वॅक्सीन संरक्षण हे कवच म्हणून उपयोगी पडले आहे. जगातील अनेक देशाला वॅक्सींची गरज होती. पण त्यांच्याकडे वॅक्सीन निर्मिती करणाऱ्या कंपन्या नव्हत्या. भारताकडे वॅक्सीन नसती तर काय झाले असते. २०१४ मध्ये व्हॅक्सिनेशनचे कव्हरेज ६० टक्के होते. या गतीने व्हॅक्सिनेशन केले असते तर ४० वर्ष लसीकरणाला लागले असते. मात्र, आपण व्हॅक्सिनेशनचा वेग वाढवला. भारतात आतापर्यंत २३ कोटी वॅक्सीन देण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

भावा-बहिणींच्या आयुष्याशी खेळतायत

कोरोना लसीकरणावरून लोकांनी अनेक माध्यमांद्वारे शंका-कुशंकाना उपस्थित केल्या. जनतेनी लस घेऊ नये, यासाठी अफवा पसरवले. जे लोक अशा प्रकारे अफवा पसरवत आहेत, त्यांनाही देश बघत आहे. जे लोक अशाप्रकारे लसीवर शंका उपस्थित करत आहेत, अफवा पसरवत आहेत ते आपल्या भोळ्या भाऊ-बहिणींच्या जीवाशी खेळत आहेत. अशा अफवांपासून सतर्क राहण्याची जास्त आवश्यकता आहे.” असे सांगताच मी सर्वांना विनंती करतो, लसीबाबत जागृकता वाढवा, असेही आवाहन मोदींनी केले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button