१८ ते ४५ वर्षांवरील वयोगटांचे मोफत लसीकरण होणार; नवाब मलिकांचे संकेत

Nawab mailk - Maharastra Today
Nawab mailk - Maharastra Today

मुंबई :- कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्पा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल, असे केंद्राने नुकतेच जाहीर केले आहे. यानंतर राज्य सरकारही जनतेचे मोफत लसीकरण करणार आहे, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिले आहेत.

राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढले जातील. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान, कोविशील्ड केंद्राला १५० रुपये, तर राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना तर १ हजार २०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी होकारसुद्धा दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (शनिवारी) जाहीर केले आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान, मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे, अशी सुद्धा माहिती नवाब मलिक यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button