लसीसोबत बिर्याणी निःशुल्क; फ्रीज, दुचाकी जिंकण्याचीही संधी!

चेन्नई : कोरोनाच्या लसीकरणासाठी (corona vaccination) सरकारसोबत काही संस्थाही मैदानात उतरल्या आहेत. जिल्ह्यातील कोळ्यांची बहुसंख्या असलेल्या कोवलमची लोकसंख्या १४ हजार ३०० आहे. यापैकी ६ हजार ४०० जण लस घेण्यासाठी पात्र आहेत; पण या गावात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नव्हता. दोन महिन्यांत फक्त ५४ लोकांनी लस घेतली. आता लस घेणाऱ्याला निःशुल्क बिर्याणीसोबत लकी ड्रॉ (Lucky draw) जिंकण्याची योजना घोषित करण्यात आली आहे.

‘एसएटीएस फाउंडेशन’ (SATS Foundation) या सामाजिक संस्थेने ही योजना घोषित केली आहे. फाउंडेशनला एसएन रामदास फाउंडेशन आणि चिराज ट्र्स्टने मदत केली आहे. या संस्थांचे स्वयंसेवक लसीचा डोस घेणाऱ्यांना बिर्याणी निःशुल्क देत आहेत. लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीसही ठेवले आहे. एसएटीएस फाउंडेशनचे सुंदर म्हणालेत की, या योजनेनंतर लसीकरणाला प्रतिसाद वाढला आहे. मागील तीन दिवसांमध्ये ३४५ जणांचे लसीकरण झाले आहे. लकी ड्रॉमध्ये मिक्सर, ग्राइण्डर, सोन्याची नाणी देण्यात येणार आहेत.

एक बम्पर ड्रॉसुद्धा होणार आहे. त्यात फ्रीज, वॉशिंग मशीन आणि स्कूटर जिंकण्याची संधी लस घेणाऱ्यांना मिळणार आहे. रामदास फाउंडेशनचे गौतम रामदास म्हणालेत की, कोवलम गाव कोरोनामुक्त करण्याचा आमचा उद्देश आहे. येथे लवकरात लवकर १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा हेतू आहे. हे गाव भारतामध्ये लसीकरणासंदर्भातील आदर्श गाव म्हणून नावारूपास यावे असा आमचा प्रयत्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button