कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पंतप्रधानांची घोषणा; मोफत शिक्षण, मासिक भत्ता मिळणार

PM_Narendra_Modi

नवी दिल्ली :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना साथीच्या रोगाने अनाथ झालेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत (PM Care for Children Schemes) मदत दिली जाईल. अशा मुलांना १८ वर्षांपर्यंत मासिक भत्ता आणि २३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पीएम केअरकडून १० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. केंद्र सरकार अशा मुलांना मोफत शिक्षण देईल. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.

पंतप्रधान कार्यालयाने असेही म्हटले आहे की, ज्या मुलांनी कोरोनामुळे (Corona) आई आणि वडील गमावले आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. आणि त्याचे व्याज पीएम केअर फंडातून दिले जाईल. यासह, त्यांना १८ वर्षांपर्यंत पाच लाख रुपयांचा विनामूल्य आरोग्य विमादेखील मिळणार आहे. त्याचे प्रीमियम पीएम केअर फंडातून दिले जातील.

या विशेष मदतीची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अशा कठीण काळात आपल्या मुलांची काळजी घेणे आणि उज्ज्वल भविष्याची आशा जागृत करणे हे एक समाज म्हणून आपले कर्तव्य आहे. कोरोनामुळे माता आणि वडील दोघेही गमावलेल्या सर्व मुलांना ‘पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत मदत केली जाईल. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान केअर फॉर चिल्ड्रेनच्या सौजन्याने कोरोनाबाधित मुलांचे सबलीकरण करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांबरोबर सरकार खंबीरपणे उभे आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button