फसवणूक : महात्मा गांधीजींची पणती आशिष लताला ७ वर्षांचा तुरूंगवास

Ashish Lata Ramgobin

महात्मा गांधीजींची पणती आशिष लता रामगोबिन (५६) यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात दक्षिण आफ्रिकेतील कोर्टाने ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. लता यांच्यावर ६० लाख रँड (३ कोटी रुपये) ची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

आशिष लता रामगोबिन (Ashish Lata Ramgobin) यांनी उद्योगपती एस. आर. महाराज यांना फसवल्याचा आरोप आहे. आशिष लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांची कन्या होत. इला गांधी या महात्मा गांधींचे पुत्र मणिलाल गांधी यांच्या कन्या आहेत.

प्रकरण

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण २०१५ चे आहे. आशिष लता यांच्यावर दक्षिण आफ्रिकेतील NPA चे ब्रिगेडियर हंगवानी मूलौदजी यांनी आरोप केला होता की, आशिष लता यांनी गुंतवणूकदारांना विश्वास देण्यासाठी बनवाट कागदपत्र दिले होते, ज्यात म्हटले होते की, भारतातून लिनेनचे तीन कंटेनर येत आहेत. त्यावेळी आशिष लता यांना ५० हजार रँडच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आलं होतं.

सोमवारी (७ जून) रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटले आहे की, आशिष लता यांनी ‘न्यू आफ्रिका फुटवेअर डिस्ट्रिब्युटर्स’चे संचालक एस. आर. महाराज यांच्याशी ऑगस्ट २०१५ मध्ये चर्चा केली होती. महाराज यांची कंपनी कपडे, लिनेन आणि चप्पल-बुटांची आयात, निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करते. महाराज यांची कंपनी लाभांशाच्या आधारावर इतर कंपन्यांना वित्तीय मदतही देते. आशिष लता यांनी महाराजांना सांगितले होते की, त्यांनी साऊथ आफ्रिकन हॉस्पिटल ग्रुप नेट केअरसाठी लिनेनचे तीन कंटेनर मागवले आहेत.

स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, आशिष लता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि नेट केअरची कागदपत्र या आधारावर महाराज यांनी कर्जासाठी त्यांच्यासोबत लिखित करार केला होता. मात्र, त्यांना बनावट कागदपत्रांबाबत कळल्यानंतर त्यांनी आशिष लता यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button