विजमाफीबाबत शसनाकडून फसवणूक : मंगळवारी कोल्हापुरात मोर्चा

Morcha

कोल्हापूर :- ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी गेल्या ५ महिन्यात अनेक वेळा घरगुती वीज बिलांत सवलत दिली जाईल असे जाहीर केले आणि आता घुमजाव करुन बिले भरावीच लागतील, अन्यथा वीज पुरवठा खंडीत केला जाईल असे जाहीर केले आहे. ही केवळ ऊर्जामंत्री नाही तर राज्य सरकारने केलेली सर्वसामान्य जनतेची व वीजग्राहकांची फसवणूक आहे. त्यामुळे या फसवणुकीचा निषेध करण्यासाठी आणि वीज बिल माफी मिळालीच पाहीजे” या मागणीसाठी इचलकरंजी येथे प्रांताधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे, प्रताप होगाडे व विविध पक्ष व संघटना नेते या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मंगळवार (दि. २४) सकाळी ११ वाजता शहरातील सर्व पक्ष, संघटना कार्यकर्ते व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांनी हजारोंच्या संख्येने महात्मा गांधी पुतळ्यानजीक जमावे असे आवाहन इचलकरंजी शहर सर्वपक्षीय कृति समिती केले आहे.

देशातील केरळ, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातील शासनांनी संपूर्ण लॉकडाऊन कालावधीसाठी ५०% वीज बिल माफीचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला आहे. पुरोगामी व प्रगत म्हणविणा-या महाराष्ट्र सरकारने मात्र अद्याप गरीब व सर्वसामान्य वीज ग्राहकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. ४ महिने होऊनही कोणताही निर्णय न झाल्याने राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ही सर्व वस्तुस्थिती व राज्यातील असाधारण परिस्थिती ध्यानी घेऊन दरमहा ३०० युनिटस पर्यंत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाऊन कालावधितील सर्व ६ महिन्यांची वीज देयके पूर्णपणे माफ करण्यात यावीत व त्यासाठी आवश्यक त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी अशी मागणी सहभागी सर्व पक्ष व संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : वीजबिलमाफीसाठी कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन ? मनसे – भाजपवर राऊतांचा निशाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER