
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या ‘ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटी’ने सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांची भेट घेऊन कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शवला. या कायद्यांचे समर्थन करणारा शेतकऱ्यांचा हा चौथा गट आहे.
‘ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटी’च्या शिष्टमंडळाने तोमर यांना भेटून कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असल्याचे सांगितले. वादावर तोडगा काढण्याशी निगडीत काही बदल करून ते कायदे कायम ठेवावेत. वाद लवकर निकाली काढण्यासाठी लवादाची स्थापना श्रवि, अशा सूचना केल्यात.
अनेक वर्षांच्या लढ्यानंतर संबंधित कायदे पुढे आले आहेत. दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची काही शक्तिंनी दिशाभूल केली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणारे स्वातंत्र्य त्या शक्तिंमुळे हिरावले जाऊ नये, असे त्या शिष्टमंडळाने म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला